¡Sorpréndeme!

पर्यावरणपूरक बाप्पांसाठी पेटंट मिळवणारे पहिले शिल्पकार - अभिजित धोंडफळे | गोष्ट असामान्यांची भाग ५५

2023-09-13 3 Dailymotion

अभिजित धोंडफळे हे पुण्यातील प्रसिद्ध शिल्पकार आहेत. शाडू मातीच्या मूर्तीपेक्षाही वजनाने हलक्या असणाऱ्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती ते साकारतात. यासाठी त्यांनी नवीन मिश्रण तयार केलं असून ऑगस्ट महिन्यात त्याचं पेटंटही मिळवलं आहे. आपल्या वडिलांच्या नावे तयार केलेल्या या मिश्रणाला त्यांनी 'रवींद्र मिश्रण' असं नाव दिलं आहे. या मिश्रणापासून तयार केलेल्या मूर्ती अवघ्या अर्धा ते पाऊण तासात पाण्यात विरघळून जातात. विशेष म्हणजे अशा पद्धतीचं पेटंट मिळवणारे ते देशातील पहिलेच शिल्पकार ठरले आहेत. १९४१ साली त्यांच्या आजोबांनी सुरू केलेली ही पर्यावरणपूरक चळवळ अभिजित आज यशस्वीपणे पुढे घेऊन जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये ‘मन की बात’च्या कार्यक्रमात अभिजित यांच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या चळवळीची नोंद घेतली होती.